मातृदिनी रंगले ऑनलाईन कवी संमेलन, साहित्यरत्न चंदगडचा अनोखा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2021

मातृदिनी रंगले ऑनलाईन कवी संमेलन, साहित्यरत्न चंदगडचा अनोखा उपक्रम


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     मनाच्या हळव्या कोपऱ्यातून उमलत येणारी कविता ही संवेदनाशील माणसाच्या जगण्याचा भाग असते.म्हणून मातृदिनाचे औचित्य साधून साहित्य रत्नं चंदगड परिवारामार्फत आज आँनलाईन कवी संमेलन संपन्न झाले.

      यावेळी राहूल नौकुडकर म्हणाले की,सध्याची आजूबाजूची स्थिती भयावह असली तरी माणसाचा संवाद थांबू नये.माणसांने समाज माध्यमांचा वापर करून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.त्याचेच एक प्रतिक म्हणजे आजचे मातृदिनाचे कवी संमेलन होय.

    संजय साबळे यांनी प्रास्तविक करत नवोदित कवींच्या साहित्यिक प्रवासासाठी शुभेच्छा दिला. मातृदिनाचे औचित्य साधून कवी अनिकेत कांबळे,प्रशांत गवसेकर,गुरूनाथ किरमटे,दशरथ कांबळे,राहूल गवस,रजनी कांबळे,मयूरी जाधव,अर्जुन मुतकेकर,कल्लापा पाटील यांनी कविता सादर केल्या.

        आपल्या समधूर व गोड आवाजाने शितल संकपाळ यांनी आईचे थोरवी गाणारे गाणे म्हणून या कार्यक्रमाची रंगत वाढवली. या आँनलाईन कार्यक्रमाला प्रमोद कदम,विठोबा नेसरकर,दिनेश परिट आदि साहित्यिक जाणकर उपस्थित होते. कवी संमेलनाचे सुत्रसंचालन प्रमोद चांदेकर यांनी केले तर कथाकार बाबूराव पाटील यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment