ऐकाव ते नवलच, सांबरेतील शेतकरी चक्क शेतात पिकविणार गॅस, भारत देशातीतील पहिलाच प्रकल्प - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2021

ऐकाव ते नवलच, सांबरेतील शेतकरी चक्क शेतात पिकविणार गॅस, भारत देशातीतील पहिलाच प्रकल्प

 तेऊरवाडी (एस. के. पाटील) / सी. एल. वृत्तसेवा

         कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज तालूक्यात असणाऱ्या सांबरे येथे शेतकरी शेतातच गॅस पिकवणार असल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे ऐकायला जरी नवलच वाटत असले तरी ही बातमी खरी आहे. शेतकऱ्यांकडून १ हजार रुपये टन याप्रमाणे हत्ती गवताची खरेदी करून त्यापासून प्रतिदिन १ हजार टन गॅसनिर्मितीचा प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ शुक्रवार दि. १ ४ रोजी नियोजित केला आहे.

       केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांचे अशा स्वरूपाच्या प्रकल्प निर्मितीचे स्वप्न होते. तेच स्वप्न नेसरी जवळील गडहिंग्लज -चंदगड तालूक्याच्या सिमेवर वसलेल्या सांबरे येथे साकार होत आहे. सध्या कोविड असल्याने अडचणी वाढल्या असल्या तरीही २६ जानेवारी २०२२ ला हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत कार्यन्वीत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मुंबईच्या मिरा क्लिन फ्युएल्स (MCL) या मुख्य  कंपनिकडून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

          यानुसार गडहिंग्लज फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या गडहिंग्लज फार्मर कंपनीचे सध्या २४०० शेतकरी सभासद आहेत. अजून १० हजार पर्यंत सभासद  वा वाढविण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक शेतकऱ्या क्डून ५०० रूपये भरून घेतले जात आहेत. यापैकी २५० रुपये शेअर्स तर २५० रुपयेची खते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत . यातून शेतकऱ्यांनी गवताची लागण करायची आहे. पण या कंपनिसाठी हत्ती गवताच्या जातीतील *सुपर नेपिअर* या विकसित वाणाचा वापर करायचा आहे. याचे बियाणही कंपनिच पुरवणार आहेत . या परिसरात हे गवत चांगले वाढते. याचा खर्चही काहीच नाही .७५ दिवसात एकरी ४० टनाचे उत्पादन होते. हे गवत शेतकऱ्यांकडून हिच कंपनी १ हजार टनाप्रमाणे खरेदी करणार आहे. एकराला वर्षाला दिड लाख अत्यल्प खर्चात उत्पादन मिळते. ऊसाचा विचार केला तर एकरी ४० टनाचे १ लाख २० हजार रुपये मिळतात. पण सर्व खर्च वजा जाता निम्मे पण उरत नसल्याने हा प्रकल्प शेतकऱ्यांना वरदायी आहे. त्याबरोबरच  या गवताची कापनी व वाहतूकही कंपनिच करणार आहे.

       महाराष्ट्रात सध्या ८८ सीएनजी गॅस पंप मंजूर झाले आहेत. सांबरे येथील या प्रकल्पातून सीएनजी, पीएनजी व बायो फीर्टीलायझरची उत्पादने घेतली जाणार आहेत. तसेच येथील या कंपानित प्रत्यक्ष १५०० कर्मचारी लागणार असून बाहेर फिल्ड वर्कसाठी १००० कर्मचारी लागणार आहेत. त्यामुळे या परिसरात मोठा रोजगारही निर्माण होणार आहे.

       कब्बड्डीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सांबरे गावाचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. येथे भात, ऊस, मका आदि पिके घेतली जातात. घटप्रभा नदिजवळ वसलेल्या या गावात गवतापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प निर्माण होत असल्याने सांबरे गाव देशाच्या नकाशात झळकणार हे मात्र निश्चित.



No comments:

Post a Comment