![]() |
अडकुर ग्रामपंचायत. |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर ( ता. चंदगड ) कोरोना हॉट स्पॉट होत आहे . त्यामूळे येथे सध्या चालू असलेल्या जनता कर्फ्यूची मुदत वाढविण्यात आली आहे . आज रविवार दि .९ पासून ते शनिवार दि .१५ मे पर्यंत जनता कर्फ्यू केली असल्याचे अडकूर- मलगेवाडी ग्रामपंचायतीने जाहिर केले आहे .
आज तहसिलदार , गटविकास अधिकारी , पोलिस निरीक्षक यानी काही मार्गदर्शक सूचना दिल्याने हा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे . सध्या अडकूर येथे ५४ कोरोणा रुग्ण आहेत . कोरोणाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कडक बंधने जाहिर करण्यात आली आहेत . दि .१५ मे पर्यंत सर्व बँका व पतसंस्था बंद असतील . कृषी दुकाने सकाळी ६ते सकाळी ९ पर्यंत चालू राहतीत . किराणा दुकानदाराना केवळ ऑर्डर घेऊन घरपोच सेवा देता येईल . दुकानासमोर कोणी ग्राहक आढळल्यास फौजदारी दाखल केली जाईल . गावातील गिरण्या सकाळी ८ते १० व सायंकाळी ४ ते ६ पर्यंत चालू राहतील . गावात कोणताही कार्यक्रम होणार नाही . या नियमांचे उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड व गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment