गोकुळच्या नुतन संचालक श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचा आजरा येथे सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2021

गोकुळच्या नुतन संचालक श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचा आजरा येथे सत्कार

गोकुळच्या नूतन संचालक श्रीमती अंजनाताई रेडेकर सत्कार प्रसंगी

चंदगड / प्रतिनिधी

          कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल  श्रीमती अंजनताई केदारी रेडकर यांचा अखिल भारतीय मराठा महासंघ, आजरा  तालुका यांचेमार्फत सत्कार करण्यात आला.

     यावेळी स्वागत बंडोपंत चव्हाण, अध्यक्ष आजरा तालुका प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष, मारुतीराव मोरे यांनी केले. मनोगतामध्ये सौ भैरवी सावंत आणि राजाराम पोतनीस यांनी गौरवपर भाषण केले सत्कार प्रसंगी श्रीमती अंजनताई रेडकर गोकुळ  दूध उत्पादक सभासदांना  पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या सूचनेप्रमाणे,दुधुउत्पादकांच्या भल्या साठी काम करून अमूल च्या तोडीस तोड काम करून दाखवणार असल्याचे संगीलते,मराठा महासंघाने घरगुती पद्धतीचा सत्कार केले,कार्यक्रमाचे आभार सरचिटणीस  प्रकाश देसाई यांनी मानले तसेच कर्यक्रमाचे सूत्रसंचालन  कार्याध्यक्ष, समभाजीराव इंजल  यांनी मानले.

No comments:

Post a Comment