ग्रामपंचायत अडकूर |
अडकूर- सी.एल. वृत्तसेवा
कोरोणा रुग्णांच्या वाढत्या संख्येचा थसका घेऊन अडकूर ( ता. चंदगड ) कोरोना दक्षता कमिटी व अडकूर ग्रामपंचायतीने बुधवार दि .५ ते रविवार दिं ९ मे पर्यंत जनता कर्फ्यू जाहिर करण्यात आला आहे .
या काळात गावातील लोकांना बाहेरगावी जाता येणार नाही तसेच बाहेरगावच्या कोणासही गावात प्रवेश दिला जाणार नाही . त्याचबरोबर गावातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत . दुध संस्थाना दुध संकलन करताना मास्कचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . त्याचबरोबर सर्व बँकानी आपले आर्थिक व्यवहार बंद ठेवावेत .केवळ अत्यावश्यक सेवा , डॉक्टर , मेडिकल , दुध डेअरी एवढेच चालू राहणार आहेत . या कालावधीत नियमांचा भंग करणाऱ्या व्यावसायिक अथवा व्यक्तिवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा कोरोना दक्षता कमिटीने दिला आहे . हा निर्णय ग्रामपंचायत , पंचायत समिती सदस्य , कोरोना दक्षता कमिटी , प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून घेण्यात आला आहे.
सध्या कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे . नागरिकांना याचा धोका ओळखून कोविड नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे . अजूनही नियम भंग केले जात आहेत . याचा परिणाम रूग्णसंख्या वाढून आरोग्य यंत्रणेव प्रचंड ताण वाढत चालला आहे . त्यामुळे अडकूर व परिसरातील सर्व ग्रामस्थांनी जनता कर्फ्यूला सहकार्य करून कोरोना साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहनही डॉ . सोमजाळ यानी केले.
No comments:
Post a Comment