हंदेवाडी येथे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

03 May 2021

हंदेवाडी येथे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

हंदेवाडी येथे आरोग्य तपासणी करताना पथक

आजरा - प्रतिनिधी
राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे या पार्श्वभूमीवर हंदेवाडी व कोळिंद्रे ( ता. आजरा )येथील ग्रामस्थांची घर टू घर आरोग्य तपासणी करण्यात आली.
 गावातील लहानापासून ते वयोवृद्ध नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग,ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आले .सनियंत्रक वसंत सावंत,शंकर कुंभार,आरोग्य सेविका सी ए शिंदे,पूनम पाटील,मदतनीस सौ. संकपाळ,अंगणवाडी सेविका अंजना हेबाळकर,आशा वर्कर,पो. पाटील पुंडलिक फडके,रवींद्र पटेकर कोरोना कमिटी यांचे सहकार्याने गावातील प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी झाली एकूण 112 कुटुंबांचा सर्वे झाला. यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.



No comments:

Post a Comment