जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातून राजपत्रित उपआयुक्त, विभागीय आयुक्त पदापर्यंत मजल मारलेल्या पार्ले (झेंडेवाडी) येथील राजाराम झेंडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेले आढावा. - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2021

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातून राजपत्रित उपआयुक्त, विभागीय आयुक्त पदापर्यंत मजल मारलेल्या पार्ले (झेंडेवाडी) येथील राजाराम झेंडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेले आढावा.

 जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातून राजपत्रित उपआयुक्त, विभागीय आयुक्त पदापर्यंत मजल मारलेल्या पार्ले (झेंडेवाडी) येथील राजाराम झेंडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेले आढावा.

राजाराम झेंडे 


     वडील  प्रतापराव झेंडे प्राथमिक शिक्षक यांच्याकडूनच शिक्षणाचे बाळकडू घेतल्यानंतर त्यांच्या खडतर प्रवासाला प्रारंभ केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण 1 ली ते 7 वी शिक्षण मराठी शाळा पाटणे व 8 वी ते 10 वी हायस्कूल शहाजी विद्या मंदिर पाटणे येथे झाले. 11 व 12 वी न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे झाले. त्यानंतर मात्र पुढील शिक्षणासाठी त्यांना घर सोडावे लागले. त्यापुढील शिक्षण मुंबई येथे मामाच्या घरी राहून पूर्ण केले. मुंबई येथे शिक्षण घेत असताना बाहेर मिळेल ते काम व खाजगी नोकरी यांचा ताळमेळ घालत एल. एल. बी. ची पदवी मिळवली. जिद्दीच्या जोरावर मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षा दिली. यामध्ये त्यांना यश मिळाले. 1989 साली सेवेत दैदिप्यमान यश मिळवले व दुर्गम भागातील पार्ले गावातील राजपत्रित अधिकारी होणारे ते पाहिले अधिकारी होण्याचा मान मिळवला.

     राजाराम प्रताप झेंडे यांचा जन्म 26 मे 1963 साली झाला. त्यांनी मेहनतीच्या जोरावर एम. ए. एल. एल. बी. पर्यंत शिक्षण पुर्ण करुन त्यांनी सेवा सुरु केली. 

18 जुलै 1989 रोजी सेवेला रुजू झाल्यापासून या पदावर कार्यरत असताना परिविक्षाधीन - उपमुख्य कार्यकारी  अधिकारी जि. प.सिंधुदुर्ग, बालविकास प्रकल्प अधिकारी, भिवंडी-ठाणे,.प्रकल्प संचालक जि. ग्रा. वि. यंत्रणा रायगड (अलिबाग), प्रकल्प संचालक जि. ग्रा. वि. यंत्रणा सिंधुदुर्ग (कुडाळ), उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. वि. जि. प. कोल्हापूर, गटविकास अधिकारी वर्ग -१ पं. स. कोरेगाव, जि. सातारा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) जि. प. सातारा, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. कोल्हापूर, उपआयुक्त (विकास-योजना) विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, उपआयुक्त (विकास-आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती, सह सचिव महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग मुंबई. उप आयुक्त (विकास-योजना) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे 04-11-2019 ते 31-05-2021 (निवृत्त) इतक्या मोठ्या पदावर कार्यरत राहून काम केले आहे. 

         जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये सेवेत असताना  संपूर्ण जिल्ह्यात  विकास कामे राबवित असताना आपले मूळ गाव पार्ले याठिकाणी स्वतः जातीनिशी लक्ष घालून आपले ही गाव इतर अनेक सुख सुविधा पासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष्य देवून गावचे नंदनवन केले व विकास कामे करून घेतली. आज पार्ले गावात जी विकास कामे झाली आहेत त्यात झेंडे साहेबांचा मोलाचा वाटा आहे.

       गावात आल्यानंतरही त्यांनी कधी प्रशासकीय अधिकारी असल्याचे गावाला जाणवू दिले नाही. प्रशासकीय सेवेत असताना आपल्या  जन्मभूमी असलेल्या पार्ले गावाशी नाळ कधीही तुटू दिली नाही. जिल्ह्यात काम करत असताना आपल्या चंदगड  तालुक्यातुन येणाऱ्या नागरिकांची जातीनिशी लक्ष घालून समस्या सोडविल्या. त्यांनी कधीही आपल्या प्रशासकीय अधिकारी पणाचा अविर्भाव केला नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा कौतुकास्पद आहे.

        प्रशासकीय सेवेत असताना त्यांच्या उत्कृष्ट कार्या विषयी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २७-०१-२००२ साली सातारा जिल्ह्यातील धामनेर हे गाव दत्तक घेवून जिल्ह्यामध्ये प्रथम पुरस्कार मिळवला होता. २००८ साली अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जि. प. कोल्हापूरमध्ये असताना त्यांनी निर्मल-ग्राम स्पर्धेत देश पातळीवर कोल्हापूर जिल्हा प्रथम आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

        २००८ या वर्षासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून निवड झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. २००९ साली ' जलस्वराज्य प्रकल्प' राज्यस्तरावर चौथा व विभागीय स्तरावर पहिला आणण्यासाठी परिश्रम घेतले होते. कर्तव्यदक्ष व प्रशासनावर घट्ट पकड असणारे प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. 

म्हणूनच आज ही झेंडे साहेब शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर ही प्रशासनामध्ये असे अधिकारी पुन्हा होणे नाही अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे हे त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या प्रामाणिक सेवेचे फळ म्हणावे लागेल. ते दि. ३१ मे २०२१ रोजी प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेत गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत.



No comments:

Post a Comment