अडकूर गावाशी संलग्न वस्तींना व्हिलेज लाईट मिळावी यासाठी महावितरणला निवेदन देताना पदाधिकारी. |
अडकूर / प्रतिनिधी
अडकुर (ता. चंदगड) हे चंदगड तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठ असणारे गाव त्यामुळे आजू बाजूच्या वाड्यामधे लोकवस्ती वाढत आहे. आजू बाजूच्या वाड्या गावाशी संलग्न आहेत. अशा गाव सलंग्न वस्तींना शेती पंपाची लाईट न देता विल्लेज लाईट मिळावी. यासाठी विद्युत मंडळचे अधिकारी श्री. हडपद यांना निवेदाद्वारे देण्यात आले.
तसेच सुरळीत विद्युत पुरवठा मिळावा. ही लाईन हरिजनवाडा ते ख्रिचनस्मशानभूमी ते पाटील वाडा असा रोड संलग्न विद्युत पुरवठा मिळावा. यामुळे लोकांची सोय होऊ होईल. यासाठी माजी सभापती बबनराव देसाई, पदाधिकारी शिवराज देसाई, संदीप देसाई, अभिजित देसाई, संजय देसाई, सुरेंद्र आर्दाळकर आदींनी महावितरणचे अधिकारी यांना निवेदन दिले.
No comments:
Post a Comment