संग्रहित छायाचित्र |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामातील भात पिक पेरणी व लागवडीसाठी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानित भात बियाणे मिळणार आहेत. चंदगड तालुक्यातील जे शेतकरी 'महाबीज' चे इंद्रायणी, भोगावती, फुले समृद्धी, सीओ ५१, आर टू एन १ ही बियाणे खरेदी करू इच्छितात त्यांना तालुका कृषी कार्यालयामार्फत अनुदान मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून खरेदी परवाना दिला जाईल त्यानंतर त्यांनी कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करावे. यासाठी स्वतःच्या नावाचा सातबारा उतारा, आधार कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे. प्रति शेतकरी २५ किलो अनुदानित बियाणे मिळण्याची तरतूद आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषीअधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment