कोवाड महाविद्यालयात शाहू जयंतीनिमित्त वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2021

कोवाड महाविद्यालयात शाहू जयंतीनिमित्त वृक्षारोपण

कोवाड महाविद्यालयात राजर्षी शाहु जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड ( ता. चंदगड ) येथील सांस्कृतिक एन. एस. एस. व  इतिहास विभाग यांच्या वतीने शाहू जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         प्रारंभी प्रास्ताविक प्रा.डॉ.आर डी. कांबळे यांनी केले आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे शाब्दिक स्वागत करून दोन्ही कार्यक्रमांचे स्वरूप विशद केले. त्यानंतर महाविद्यालयातील प्रा. एस. जे. पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. व्ही. आर. पाटील यांनी शाहू राजे यांच्या कार्याचा आढावा घेतला.

        डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते आणि उपस्थित सर्व प्राध्यापकांच्या व प्रशासकीय अधिकारी सेवक कर्मचारी यांचे हस्ते महाविद्यालयाच्या परिसरामध्ये ५० सागवान वृक्षांची लागवड करण्यात आली. 

आभार प्रा. डॉ. के. एस. काळे यांनी मांडले. यावेळी प्रा. डॉ. ए. एस आरबोळे, प्रा. एस. जे. पाटील, डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. ए. के. कांबळे, प्रा. आर टी. पाटील, डॉ. व्ही. के. दळवी, डॉ. दीपक पाटील, डॉ. के. पी. वाघमारे, प्रा. मुकेश कांबळे, डॉ. श्रीकांत पाटील, विलास शेटजी, दयानंद पाटील, मारुती बिर्जे, प्रा. एन. पी. महागांवकर, अजित व्हण्याळकर, दीपक पाटील, लक्ष्मण बागीलगेकर उपस्थित होते.

       सदर कार्यक्रमाचे आयोजन covid-19 प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सामाजिक अंतर जपून  सांस्कृतीक विभाग व  एन एस एस विभागाने आयोजित केले होते.

No comments:

Post a Comment