![]() |
छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य आर.आय. पाटील, उपप्राचार्य ए. जी. बोकडे. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
"शाहू महाराजांनी बहूजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांना राजाज्ञा केली. जे पालक आपल्या मुलांना शाळेला पाठवत नाहीत त्यांना प्रतिमहिना एक रुपये दंड आकारण्याची कायदेशीर तरतुद केली. अशी तळमळ आजच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांकडून झाली तरच शैक्षणिक क्रांती घडेल" असे प्रतिपादन प्राचार्य आर. आय. पाटील यांनी दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भू. पाटील ज्युनि. कॉलेज चंदगड येथे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त केले. छत्रपती शाहूंच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य आर.आय. पाटील यांनी केले. उपप्राचार्य ए. जी. बोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अनंत सुतार, मधू तेजम, कार्तिक पाटील, रवि पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज तुपारे यांनी केले. ग्रंथपाल शरद हदगल यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment