हलकर्णी महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची ऑनलाइन पध्दतीने जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2021

हलकर्णी महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची ऑनलाइन पध्दतीने जयंती साजरी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) व इतिहास विभाग यांच्या वतीने आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळराव पाटील होते.        

          कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  डॉ. निलांबरी जगताप होत्या. यावेळी  डॉ. जगताप बोलताना म्हणाल्या की, ``छत्रपती शाहू महाराज हे १०० वर्षाच्या काळाच्या पुढचे विचार करणारे राजे होते. त्यानी स्त्रीया साठी विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, देवदासी प्रथा बालविवाह या सारखे कायदे करून त्यानी खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानतेच बीज त्यानी त्या काळात पेरलं गेलं.ज्या देशात स्त्रीला मान दिला जातो त्या देशाला जगामध्ये सन्मान मिळतो.शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी स्त्री विषयी समस्या मांडून त्या विरोधात आवाज उठविण्याचे काम या दोघा महापुरुषाने केले. तसेच स्त्री वर होणारे  हिंसक अत्याचार क्रुर वागणूक त्या काळात मोठ्या प्रमाणात होती त्या विरोधात त्यानी कायदे केले. स्त्री उद्घाराचे महत्वपुर्ण कार्य करणारा राजा म्हणून त्याची इतिहासात नोंद आहे. असे डॉ निलांबरी जगताप ऑनलाइन व्याख्यान्या मध्ये बोलत होत्या. यावेळी प्रास्तविक  प्रभारी प्राचार्य पी. ए. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन एम. व्ही. जाधव यांनी केले. आभार डॉ जे.जे. व्हटकर यांनी मानले.No comments:

Post a Comment