नेसरीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2021

नेसरीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा

बाळासाहेब पाटील आपल्या सर्जा - राज्या जोडीसमवेत मिरवणूक काढताना

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा 

      नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील पाटील गल्ली येथील शेतकरी बाळासाहेब दत्तात्रय पाटील यांनी सर्जा राज्या या बैलजोडीला विविध रंगानी सजवून बैलजोडीची मिरवणूक  काढली. गेल्या 50 वर्षापारून श्री पाटील यांनी ही मिरवणुकीची परंपरा जोपासली आहे. दरवर्षी ते विविध वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढतात. मात्र कोरोनामुळे गेली 2 वर्ष फटाकड्यांच्या गजरात त्यांनी बैल पोळा साजरा केला. या वेळी महिलांनी बैलजोडीला आरती ओवाळून औक्षण करून पोळ्यांचा नैवद्य दाखविला.

No comments:

Post a Comment