![]() |
तेऊरवाडी येथे कोरोना चाचणी घेताना आरोग्य कर्मचारी |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड (ता. चंदगड) यांच्या वतीने तेऊरवाडी येथे १२२ जणांची कोरोणा चाचणी घेण्यात आली. यापैकी केवळ एकच रुग्ण पॉझिटिव्ह निघाला.
गावातील सर्व दुकान व्यावसायिकांच्या बरोबरच ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटी सदस्य, दुध संस्था कर्मचारी आदिंची कोरोना टेस्ट घेण्यात आली. हि चाचणी कोवाड प्रा. आ. केंद्राच्या आरोग्य सेविका एन. एस. पाटील, एस. के. कांबळे, के. यू. कागणकर, आर. आर. भाष्कर, आरोग्य सेवक एस. एस. आगोशे, एन. सी. घोडे यांनी घेतली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेविका, पोलिस पाटील आदि जन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment