चंदगड पंचायत समिती व कोवाड केंद्रांतर्गत राजर्षी शाहू जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2021

चंदगड पंचायत समिती व कोवाड केंद्रांतर्गत राजर्षी शाहू जयंती साजरी

 पंचायत समिती चंदगड येथे राजर्षी शाहू जयंती 

चंदगड पंचायत समितीमध्ये राजर्षी शाहु महाराज जयंती प्रसंग्री उपस्थित अधिकारी व पदाधिकरी.

 चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

          पंचायत समिती चंदगड येथे लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  शाहूंच्या प्रतिमेचे पूजन सभापती अनंत कांबळे यांच्या हस्ते झाले.  

         दीप प्रज्वलन सदस्य दयानंद काणेकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर के खोत यांच्या हस्ते झाले. यावेळी डी आर पथवे, एस एम ठोंबरे, बी एम कांबळे, तानाजी सावंत, संजय चंदगडकर, दीपक कांबळे, वैभव पाटील, विठ्ठल पाटील, कुसुम कोठीवाले, प्रणव पवार, के सी कांबळे, अमोल मानतुरे, संतोष वणकुद्रे, स्मीता भांडवलकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जयप्रकाश विद्यालय येथे शाहू जयंती प्रसंगी मुख्याध्यापक व शिक्षक.

कोवाड केंद्रांतर्गत राजर्षी शाहू जयंती साजरी

           कोवाड केंद्रांतर्गत सर्व प्राथमिक व  माध्यमिक शाळांत राजर्षी छत्रपती शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळून साधेपणाने केंद्रशाळा कोवाड, निटूर, घुल्लेवाडी, मलतवाडी, दुंडगे, चिंचणे, किणी, तेऊरवाडी, जकनहट्टी आदी प्राथमिक तसेच श्रीराम विद्यालय कोवाड, जयप्रकाश विद्यालय किणी, माध्यमिक विद्यालय दुंडगे, नरसिंह हायस्कूल व शारदाबाई हाय. निटूर आदी माध्यमिक  शाळांत राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

No comments:

Post a Comment