चंदगड तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन, कोठे व का केले आंदोलन.....वाचा..... - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2021

चंदगड तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन, कोठे व का केले आंदोलन.....वाचा.....

केंद्र सरकारविरोधात चंदगड तालुका काँग्रेसच्या वतीने तहसिलसमोर आंदोलन पुकारण्यात आले होते. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार कार्यालय येथे ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे व केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

          राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी तथा सामाजिक न्याय दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या देशभरातील अघोषित आणीबाणी विरोधात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द होण्याला जबाबदार तत्कालीन केंद्र सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसीची आकडेवारी केंद्रसरकारकडे मागितली होती. ती त्यांनी दिली नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले. याला सर्वस्वी तत्कालीन फडणवीस सरकार व मोदी सरकारच जबाबदार आहे. याकरिता निषेध करण्यासाठी चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई यांच्या नेत्रुत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले होते.

        काँग्रेस पक्षाचे राज्य व्यापी आंदोलन सर्वत्र होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार व जिल्हा अध्यक्ष व पालकमंत्री बंटी पाटील यांच्या मार्गर्शनाखाली चंदगड तेथे आज आंदोलन शांततेत व कोविडचे सर्व नियम पाळत पार पाडण्यात आले.

      यावेळी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, कलीम मदार, अभिजित गुरबे, जयसिंग पाटील, जयवंत शिंदे, वसंत पाटील, प्रदीप पाटील, अशोक दाणी, सुधाकर बांदविडेकर, मेहताब नाईक, प्रसाद वाडकर, गोमटेश वणकुण्द्रे, अमोल कुंभार, ऋषिकेश जाधव, सुधीर पीळणकर, जितेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment