पी‌. जे. मोहनगेकर यांना 'रा. शाहू प्रेरणा पुरस्कार' प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2021

पी‌. जे. मोहनगेकर यांना 'रा. शाहू प्रेरणा पुरस्कार' प्रदान

मोहनगेकर यांना कोल्हापूर येथे 'रा. शाहू प्रेरणा पुरस्कार' प्रदान करताना मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    जयप्रकाश विद्यालय किणी (ता. चंदगड) चे मुख्याध्यापक व आदर्श क्रीडाशिक्षक पी. जे. मोहनगेकर यांना परिवर्तन फाउंडेशन कोल्हापूर मार्फत दिला जाणारा 'राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार- २०२१' आज शाहू जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पी. जे. मोहनगेकर

       कुस्ती, कबड्डी, हॉलीबॉल व मैदानी खेळात प्रवीण असलेल्या मोहनगेकर यांनी गेल्या पंधरा वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून अनेक राज्यस्तरीय खेळाडू घडवले आहेत. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी पंच म्हणून देखील ते परिचित आहेत. त्यांना यापूर्वी आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी खेळाडू घडवण्याच्या उदात्त हेतूने सुरु केलेले निवासी वर्ग, डिजिटल शाळा, शाळा आवारात सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व भौतिक सुविधा, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, रात्र अभ्यासिका आदी शालेय उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. महिला सक्षमीकरण, आर्मी पोलीस भरती, योग शिक्षणाचे मोफत प्रशिक्षण देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. चंदगड तालुका मुख्याध्यापक संघाचे विद्यमान सचिव आहेत. या सर्व कार्याची दखल घेत फाउंडेशनने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment