४५ वर्षाच्या प्रयत्नानंतर या गावातील ट्रान्सफॉर्मर अन्यत्र हलविण्यास यश, तालुक्यातील कोणते आहे हे गाव.........वाचा - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2021

४५ वर्षाच्या प्रयत्नानंतर या गावातील ट्रान्सफॉर्मर अन्यत्र हलविण्यास यश, तालुक्यातील कोणते आहे हे गाव.........वाचा

नागरदळे येथील ट्रान्सफॉर्मर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        नागरदळे (ता. चंदगड) गावातील अतिशय धोकादायक अशी मेन  ट्रान्सफॉर्मर ४५ वर्षांनी स्थलांतरित करण्यात ग्रामपंचायत व ग्रामस्थांना अखेर यश आले. यासाठी बऱ्याच वर्षां पासून पाठपुरावा केला जात होता.
       या कामी  सरपंच  दिलीप पाटील यांनी खास लक्ष देत काम पूर्ण करून घेतले. त्याचबरोबर उपसरपंच, सर्व ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक डी. एन. मोटुरे, वायरमन संतोष पाटील (मांडेदुर्ग), कॉन्ट्रॅक्टर श्री. पेडणेकर यांनी हजर राहून याकामी सहकार्य केले. नागरदळे गावचे सुपुत्र विनायक पाटील (अभियंता महावितरण, कोल्हापूर) व परशराम रा. पाटील (ऑपरेटर, महावितरण) यांचे विशेष सहकार्य लाभले. 
        गल्लीतील धोकादायक डी.पी. इतरत्र हलविल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ग्रामपंचायत आणि महावितरणचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment