जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा करताना नाबार्डच्या तत्वप्रणालीचा वापर करून कर्ज मर्यादा वाढवावी - महादेव प्रसादे यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2021

जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा करताना नाबार्डच्या तत्वप्रणालीचा वापर करून कर्ज मर्यादा वाढवावी - महादेव प्रसादे यांची मागणी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

               कोल्हापूर जिल्हा  मध्यवर्ती  बँक ही शेतकऱ्यांची आपली बँक म्हणून ओळखली जाते, मात्र बँकेचे नियम आणि जाचक अटी बघितल्यावर   कर्ज प्रकरणे शेतकऱ्यांना नकोशी  वाटू लागली आहेत. त्यामुळे गावा-गावातील सेवा संस्था अडचणीत आल्या आहेत. साहजिकच शेतकरीही अडचणीत आला आहे.  बँकेची स्थापना ही नफा मिळवण्यासाठी नसून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती करण्यासाठी आहे.  बँकेने नियम व अटी सुधाराव्यात आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज धोरणात सवलती द्याव्यात अशी मागणी हेरे ता.चंदगड येथील सेवा संस्थेचे अध्यक्ष महादेव प्रसादे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

       प्रसादे पुढे म्हणाले, जिल्हा जि बँक आणि सहकारी सेवा संस्थांची नाळ कर्ज प्रकरणावरून जुळली असताना ती आता वेगळ्या वाटेने वाटचाल करीत आहे. इ- करार बोजा नुसार २ लाखाचे कर्ज उपलब्ध करण्यासाठी ४ लाखाचा बोजा पाहिजेत ही धोरण चुकीचे आहे. त्यामुळे इ- कराराचे बंधन लादू नये. तसेच खावटी कर्जाच व्याज दर कमी करावा,   एखाद्या सेवा संस्थेचे क्रेडिट कमी करणे, भागभांडवल मध्ये नफा धरणे, भाग भांडवल मध्ये नफा व ठेवी धरल्यामुळे नफा कमी होतो. त्यामुळे नाबार्डच्या मार्गदर्शक तत्वानुसार  शेतकऱ्यांना कर्ज दिले गेले पाहिजेत. या प्रमुख तत्वाचा बँकेला विसर पडला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.  इ  खावंटी ला प्रोत्साहन  आणि पीक कर्जाला काटछाट हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. पीक कर्जाला जेवढी मंजुरी तितका  कर्ज पुरवठा करावाअशी मागणी प्रसादे यांनी केली.
No comments:

Post a Comment