दाटे येथील रयत सेवा फौंडेशनने उभा केला विद्यार्थांसाठी ऑनलाईन सेतू, काजिर्णे धनगरवाडयातील मुलांसाठी मोबाईल रिचार्जची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2021

दाटे येथील रयत सेवा फौंडेशनने उभा केला विद्यार्थांसाठी ऑनलाईन सेतू, काजिर्णे धनगरवाडयातील मुलांसाठी मोबाईल रिचार्जची भेट

काजिर्णे धनगरवाड्यावरील मुलांच्यासोबत रयत सेवा फौंडेशनचे कार्यकर्ते. 

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     'धनगरवाडा' या चित्रपटामुळे काजिर्णे धनगरवाडा संपूर्ण महाराष्ट्राला समजला. आज सुध्दा येथील मुलांना शिक्षणासाठी पायवाटेने चिखलातून दहा किलोमीटर पायी चालत चंदगडला यावे लागते. लॉकडाऊनमुळे येथील लोकांचा रोजगार गेला.कोरोनाच्या महामारीमुळे गेली  दिड दोन वर्ष शाळा बंद आहेत. या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला शासनाने विद्यार्थ्यांची क्षमता कौशल्यविकसित करण्यासाठी सध्या सेतू अभ्यासक्रम सुरू केला आहे.मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी ऑनलाईन तास सुरू केले. पण काजिर्णे धनगरवाडा येथील पालकांनी आपली मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून उसणवारी करून महागडे मोबाईल घेऊन दिले.

           पण दर महिन्याला महागडे रिचार्ज मारणे खिशाला परवडत नव्हते. हीच समस्या लक्षात घेऊन दाटे येथील रयत सेवा फौंडेशनकडून धनगरवाड्यावरील सर्व  विद्यार्थ्याना दोन महिन्यासाठी  रिचार्ज करून देण्यात आला. त्यामुळे लांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.ही सर्व मुले दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे शिकत आहेत.

     यावेळी मंत्रालयीन अधिकारी घनश्याम पाऊसकर म्हणाले, 'शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये. त्यासाठी प्रत्येक वाडीवस्त्यावर शैक्षणिक सुविधा पोहचविणे गरजेचे आहे. फौंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य व कृषी क्षेत्रात काम करण्याचे उद्दिष्ट आहे."

          यावेळी बँक ऑफ बडोदाचे चीफ मॅनेजर समीर नाईक,गिरीश गुरव, संजय साबळे, सूरज तुपारे , देहू यमकर, जग्गनाथ यमकर, धोडीबा पाटील, बिरू यमकर, नाना पाटील, बाबू पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment