कोरोना काळात आप्तेष्ट जे आपल्याला सोडून गेले त्यांच्या स्मरणात "एक आठवण आपल्या दारी'' - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2021

कोरोना काळात आप्तेष्ट जे आपल्याला सोडून गेले त्यांच्या स्मरणात "एक आठवण आपल्या दारी''

 


चंदगड / प्रतिनिधी :

कोरोनामुळे सगळ्या जगात थैमान मांडून अनेक जणाना जीवाला मुकावे लागले आहे. जगातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यामूळे कोलमडून गेली. या कोरोना महामारीत मृत्यू पावलेल्या मृतकांच्या कुटूंबियांतील सदस्यांना भावनिक आधार देवून त्यांची आठवण म्हणून पुण्याच्या त्रिशरण एनलाईटनमेंट फाऊंडेशनतर्फे 'एक आठवण, आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत तालुक्यातील गावांमध्ये रोप लागवड करण्यात येणार आहे. या फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. चंदगड तालुक्यातील निवड करण्यात आलेल्या विकासदूतांमार्फत ही रोप लागवड करण्यात येणार आहे.

चंदगड तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनामुळे ६२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या कुटूंबियांचे सात्वंन करुन त्यांच्या अंगणात एक झाड लावण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात तुर्केवाडी, कोवाड, कुदनूर, चिंचणे या गावांमधून झाली आहे.

त्रिशरन एनलाईटनमेंट फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे, प्रकल्प संचालक दिगंबर वाघ, कोल्हापूर जिल्हा समन्वयक अमोल माने, चंदगड तालुका समन्वयक सागर सुतार, विकासदूत महादेव कांबळे, किशोर बोकडे, अजय गावडे, रवींद्र कांबळे, संदीप पाटील, माधुरी कांबळे, ऐश्वर्या नौकूडकर, भावना जाधव, साधना खोत यांच्यातर्फे तालुक्यात एक अठवण आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आले 

तडशिनहाळ जोतिबा कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला हा धक्का त्यांचा मुलगा युवराज यांना सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या स्मृति कायम रहावी यासाठी त्रिशरन एनलाईटनमेंट फाऊंडेशनतर्फे एक आठवण आपल्या दारी उपक्रमांतर्गत रोप लागवड करण्यात आली. यावेळी राजू कांबळे, सरपंच सौ. कदम, विकासदूत माधुरी कांबळे, रुद्राप्पा तेली, रवि कोनेवाडकर उपस्थित होते.







No comments:

Post a Comment