नागरदळे येथील एकनाथ हदगल याना मुंबईरत्न पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2021

नागरदळे येथील एकनाथ हदगल याना मुंबईरत्न पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मान

 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई रत्न पुरस्कार स्विकारताना एकनाथ हदगल

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       नागरदळे (ता. चंदगड) येथील सुपुत्र  एकनाथ तुकाराम हदगल (मुंबईस्थित युवा उद्योजक) यांना कोविड १९  या जागतिक महामारी मध्ये मोलाची कामगीरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीमभगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे "मुंबई रत्न" हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

         चंदगड तालूक्यातील नागरदळेच्या या एकनाथ हदगल यांचे कार्य अभिमानास्पद आहे. "एक हाती मदत" या उपक्रमात त्यांनी सिंहाचा वाटा उचलून आपल्या मुंबईतील लोकांना लाखमोलाचे सहकार्य केले .याची दखल राज्यपालांनी घेणे फार मोठे कौतुकास्पद आहे. नागरदळे गावचे नाव राज्यपालापर्यंत पोहचवून व मोठे करून मानाचा तुरा रोवल्याबद्दल  चंदगड तालुक्यात आनंदाचे, वातावरण आहे. एकनाथ हदलग यांचे संपूर्ण चंदगड वासियानी अभिनंदन केले आहे.

                                         

No comments:

Post a Comment