चंदगड, आजरासह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांसाठी हवामान खात्याचा पावसाबाबत रेड अलर्ट, वाचा सविस्तर.... - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2021

चंदगड, आजरासह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांसाठी हवामान खात्याचा पावसाबाबत रेड अलर्ट, वाचा सविस्तर....


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे. गेले दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पावसाचा जोर असाच राहिल्यास चंदगड तालुक्यातही पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार २१ व २२ जुलै रोजी भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. विशेषतः चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा आणि भुदरगड तालुक्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज असून योग्य त्या सर्व उपायोजना करण्यात आल्या आहेत.No comments:

Post a Comment