चंदगड तालुका माध्यमिक संघातर्फे ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर वर्गाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2021

चंदगड तालुका माध्यमिक संघातर्फे ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर वर्गाचे आयोजन


तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा

        शाळा बंद पण शिक्षण सुरु आहे.
 विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे त्याचे हस्ताक्षर . जे कधीही क्षर होत नाही. नष्ट होत नाही... ते म्हणजे अक्षर... आजच्या संगणकाच्या युगातही सुंदर अक्षराचे महत्व तितकेच जास्त टिकून राहिले आहे ..सुंदर अक्षर म्हणजे आपल्या सुंदर व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे ..आणि ही ओळख आपल्याला देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांची अक्षरं घडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते 
अक्षरमित्र अमित भोरकडे  
मंगळवेढा, जि सोलापूर 
 आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.
अक्षराची गोडी माणसे जोडी
 या विद्यार्थ्यांच्या लेखणीला सुंदर हस्ताक्षराची गोडी लावण्यासाठी चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघ व इंग्लिश टीचर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर हस्ताक्षर ऑनलाईन.(Zoom Meeting )कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 9.00 ते 10.30 या वेळेत करण्यात आले आहे .
या कार्यशाळेत प्रमुख                मार्गदर्शक अमित भोरकडे (मंगळवेढा )
  सुप्रसिद्ध सुलेखनकार  करणार आहेत . तर प्रमुख सहभाग एम.टी.कांबळे,
   शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती, चंदगड ,आर आय पाटील ,अध्यक्ष मुख्याध्यापक संघ चंदगड ,ए.एस. पाटील 
 अध्यक्ष ,टीडीएफ चंदगड , रविंद्र देसाई
उपाध्यक्ष, माध्य. शिक्षक संघ कोल्हापर , व्ही जी तुपारे , प्राचार्य ,सरस्वती विद्यालय ,कालकुंद्री ,एस.डी. पाटील
माध्य. शिक्षक संघ जिल्हा प्रतिनिधी, महादेव शिवणगेकर
 अध्यक्ष, मराठी  अध्यापक संघ  , प्रशांत मगदूम तंत्रस्नेही शिक्षक,
व चंदगड तालुक्यातील सर्व संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या
 कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन
 सुभाष बेळगावकर  ,       
  पी एम ओऊळकर
  विठठल व्हन्याळकर यानी केले आहे .

*या ऑनलाईन कार्यशाळेला विद्यार्थी,शिक्षक व पालक यांनी खालील लिंक वरून  सहभागी व्हावे*.. 
Join Zoom Meeting

Meeting ID: 261 043 6430
Passcode: akshar123

 *आपले विनीत* 
 📙 *चंदगड तालुका इंग्लिश टीचर असोसिएशन चंदगड* 
📘 *चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघ*
No comments:

Post a Comment