कोवाड महाविद्यालयात ऑनलाईन कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2021

कोवाड महाविद्यालयात ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथे ऑनलाईन शिक्षण पद्धती साधने आणि आव्हाने  याविषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्ष स्थानी डॉ. ए. एस.जांभळे होते.

         प्रमुख वक्ते म्हणून राजाराम कॉलेज कोल्हापूरचे.डॉ. विश्वनाथ बिट्टे यांनी 'ऑनलाइन शिक्षणपद्धतीत् साधन' तर घाळी कॉलेजचे डॉ. एन के.शेळके यांनी 'ऑनलाइन शिक्षण पद्धतीतील आव्हाने' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.अध्यक्षिय समारोप डॉ. ए. एस.जाभळे यांनी केला. मानोगत प्र. प्राचार्य.डॉ. व्ही. आर. पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी संस्था सचिव एम. व्ही. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत प्रस्ताविक डॉ. व्ही.  के. दळवी यांनी केले. आभार प्रा. शीतल मंडले व सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले.

       कार्यशाळा लीड कॉलेज अंतर्गत झाली. यावेळी सर्व  शाखेतील प्राद्यापक, प्रशासकीय वृद. कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर कार्यशाळा शिवराज कॉलेज आणि कोवाड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.No comments:

Post a Comment