कानडी गावातील घरे अशी पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहेत.
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालूक्यात काल पडलेल्या सरासरी २६१ मि .मि.पावसाने पुरस्थिती गंभिर बनली असताना कानडी (ता. चंदगड) येथील पुरबाधित क्षेत्रातील जवळपास १५ कुंटूंबियाना रेस्कूऑपरेशन करत सुरक्षित ठिकाणी स्थानिक युवकांनी हलवले. घटप्रभा नदिच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने प्रकाश कांबळे यांचे घर पडून अंदाजे ४ लाखांचे तर सयाजी देसाई यांच्या घराची भिंत पडल्याने ५0 हजारांचे नुकसान झाले आहे.
![]() |
घरात पाणी शिरल्याने साहित्य बाहेर काढताना नागरीक. |
घटप्रभा नदिपासून ५०० मिटर अंतरावर असणाऱ्या कानडी गावामध्ये पुराचे पाणी शिरले. सयाजी देसाई, शशिकांत देसाई, प्रताप देसाई, तानाजी सुभेदार, शिवाजी सुभेदार, प्रल्हाद देसाई यांच्या घरात पाणी गेले आहे. यामुळे या घरातील सर्वाना सुरक्षित स्थळी साहित्यासह हलविण्यात आले. तसेच हिंदुराव देसाई, तानाजी देसाई, विश्वनाथ देसाई, रघुनाथ देसाई यांच्या गोट्यात सध्या पाणी शिरल्याने येथील सर्व जनावारे महादेव देसाई यांच्या गोठ्यात बांधण्यात आली आहेत. तसेच विश्वनाथ देसाई यांचा गोटा पाण्यात बुडाला आहे. तानाजी देसाई व रघुनाथ देसाई यांच्याही गोट्यात पाणी शिरले. त्यामुळे जनावारांचे हाणारे हाल पाहून येथील सर्व जनावरे बाहेर इतर ठिकाणी बांधली आहेत. तसेच शशिकांत देसाई व प्रताप देसाई यांची घरे पुर्ण पणे पाण्यात बुडाली आहेत.
सध्या सर्वच रस्ते बंद असल्याने प्रशासन तेथपर्यंत पोहचू शकत नाही. मात्र येथील युवक विलास हरेर, सुनिल देसाई, लक्ष्मन कांबळे, संभाजी कानडे, तानाजी देसाई, बबन देसाई, रघुनाथ देसाई यांच्यासह सर्व ग्रामस्थ पुरग्रस्थांना मदत करत आहेत.
No comments:
Post a Comment