माती परीक्षणाची सोय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार, हलकर्णी महाविद्यालयात माती परीक्षण प्रयोगशाळेची सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2021

माती परीक्षणाची सोय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार, हलकर्णी महाविद्यालयात माती परीक्षण प्रयोगशाळेची सुरवात


माणगाव / सी. एल. वृत्तसेवा
      चंदगड भागातील माती परीक्षणाची गरज ओळखून महाविद्यालयाने माती परीक्षणाची प्रयोगशाळा उभारली आहे . रसायनशास्त्र विभागाने उभारलेल्या या प्रयोग शाळेचा संपूर्ण तालुक्याला फायदा होणार असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गोपाळराव पाटील यांनी केले .हलकर्णी ता.चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने सुरू केलेल्या माती परीक्षण प्रयोगशाळा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . प्रारंभी  प्रास्ताविकामध्ये रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा . ए . एस . बागवान यांनी माती परीक्षणा विषयीची भूमिका मांडली व एसटीएस सॉईल टेस्टिंग आदि मशीन संबंधी माहिती सांगितली . उपस्थितांचे स्वागत व परिचय प्राचार्य पी . ए . पाटील यांनी करून दिला . यावेळी प्रयोग शाळेचे उध्दाटन तालुका कृषीअधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते झाले ते म्हणाले , ' शेतीचे आरोग्यही महत्वाचे असते . या भागाची ही एक महत्वाची गरज होती . अशा प्रकारची माती परीक्षणाची सुविधा चंदगड तालुक्यात या महाविद्यालयाने सुरु केल्याने महाविद्यालय कौतुकास पात्र आहे . माती परीक्षणासाठी मातीचे नमुने कसे गोळा करावेत याची माहिती महत्वाची आहे . सचिव विशाल पाटील निंगाप्पा आवडण ,शिवाजी हसबे ,  उत्तम पाटील , डॉ . ए . पी . गवळी , डॉ . आय . आर . जरळी आदीसह शेतकरी प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. सूत्र संचालन डॉ . टी . एम . वांद्रे यांनी केले, तर आभार प्रा . ए . एस . जाधव यांनी मानले. 


No comments:

Post a Comment