चंदगड व हुक्केरी तालुक्यातील प्रत्येकी एकावर दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2021

चंदगड व हुक्केरी तालुक्यातील प्रत्येकी एकावर दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा


चंदगड / दोडामार्ग : सी. एल. वृत्तसेवा

          मोटरसायकलवरून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना दोडामार्ग पोलिसांनी विजघर नजीक शिताफीने पकडून गुन्हा दाखल केला. याबाबत तिलारीनगर- दोडामार्ग दरम्यानच्या वीजघर चेक पोस्ट वरील ड्युटी पोलीस राजेश वासुदेव गवस यांनी दोडामार्ग पोलिसात फिर्याद दिली आहे.  

             पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार दिनांक ६ जुलै रोजी दुपारी एक वाजता संशयित सुनील मारुती यमेटकर, वय 35 (रा. मारुती गल्ली, मरणहोळ, सलामवाडी, ता. हुक्केरी जि. बेळगाव) व रानबा रामू गावडे, वय ३८ (रा. सोनारवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हे दोघे होंडा शाइन मोटरसायकलवरून तिलारीनगर कडे जात होते. त्यांच्याकडील बॅँगांची तपासणी केली असता त्यात ७३७०/- रुपये किमतीच्या गोल्डन एस डब्ल्यू विस्कीच्या १३४ क्वार्टर बाटल्या आढळून आल्या. वाहतुकीसाठी वापरलेली गाडी व मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दोडामार्गच्या पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी दिली आहे.



No comments:

Post a Comment