कालकुंद्री वाचनालयामार्फत देणगीदारांचा सत्कार व कविता लेखन स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2021

कालकुंद्री वाचनालयामार्फत देणगीदारांचा सत्कार व कविता लेखन स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

साहित्यिक रणजित देसाई यांची ग्रंथसंपदा प्रदान करताना सुरेश नाईक

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

             कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास गावातील इयत्ता दहावी (बॅच २००२) विद्यार्थ्यांकडून टाइल्स फरशी बसवून देण्यात आली. तर माजी उपसरपंच सुरेश नाईक यांनी साहित्यिक पद्मश्री रणजित देसाई यांच्या सर्व ४२ पुस्तकांचा संच देणगी दाखल सुपूर्द केला.

मान्यवरांसह दहावी बॅच २००२ चे विद्यार्थी.
     कोणतेही शासकीय अनुदान नसलेल्या या वाचनालयाचे संवर्धन ग्रामस्थांनीच सुरु ठेवले आहे. गेल्या सात-आठ वर्षात वाचनप्रेमी मान्यवरांनी शेकडो ग्रंथ, पुस्तके, साप्ताहिक, मासिक, दैनिक वर्तमानपत्रे, फर्निचर आदी देणगीदाखल दिले आहे व देत आहेत. तर दहावी वर्गमित्र यांनी सुमारे वीस हजार रुपये खर्चाची फरशी बसवून दिली. गावातील पेंटर एस के मुर्डेकर यांनी अंतर्गत रंगरंगोटी व लिखाण करून दिले. याबद्दल सर्वांचा सत्कार करण्यात आला. वाचनालयाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या गाव मर्यादित कविता लेखन स्पर्धेत एकूण २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्याचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. 

कविता लेखन स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना प्रथम क्रमांक विजेती सुचिता भातकांडे.

           या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सुरेश नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक एम बी पाटील उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष के जे पाटील यांनी तर प्रस्ताविक प्रा व्ही आर पाटील यांनी केले. यावेळी विनायक पाटील, श्रीकांत पाटील, सुखदेव भातकांडे, क पा पाटील आदींची समयोचित भाषणे झाली. यावेळी वाचनालय पदाधिकारी, देणगीदार विद्यार्थी, कवितालेखन स्पर्धेतील विजेते, वाचक, हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार युवराज पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment