कोल्हापूर काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांची निवडीचे दिले संकेत - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2021

कोल्हापूर काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांची निवडीचे दिले संकेत

नामदार सतेज पाटील 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद,नगरपालिका,-पंचायतसमिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी . पक्षाची गाव, वाडी आणि वस्तीवर नव्याने भक्कमपणे बांधणी केली तरच पक्षाची प्रचंड ताकद उभी राहू शकते. त्यासाठी काँग्रेस पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचे संकेत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ना. सतेज पाटील यांनी दिले असल्याचे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस विद्याधर गुरबे यांनी सांगितले.

           पक्षाचा कार्यकर्ता हाच कोणत्याही संघटनेचा मजबूत पिलर असतो. तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला लोकांच्या समस्या, अडचणी काय असतात याची खोलवर माहिती असते. त्यामुळे तळागाळातील काँग्रेसच्या सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीमागे संघटनेची शक्ती उभी करण्यासाठी त्याच्यावर गाव स्थरावरावरील अधिक महत्वपूर्ण जबाबदारी व विश्वास दिला तरच पक्ष संघटन जनतेसाठी उपयोगी पडणार आहे. म्हणूनच आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनेत नव्या दमाचे उत्साही, कार्यक्षम, अभ्यासू व  ज्यांच्या पाठीशी जनाधार आहे, अशा होतकरू कार्यकर्त्याना पक्ष संघटनेत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ झटकून उर्जितावस्था देण्यासाठी पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचे स्पष्ट संकेत जिल्हाध्यक्ष ना. सतेज पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे ज्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी घेऊन काम करायचे असेल, त्यांनी आज पर्यत केलेल्या सामाजिक कामाचा अहवाल व आपला बायोडाटा तयार ठेवावा.  जिल्हाध्यक्ष  ना. सतेज पाटील स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याचे गुरबे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment