जिल्हा स्तरीय शाळासिद्धी समितीची उत्साळी शाळेला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2021

जिल्हा स्तरीय शाळासिद्धी समितीची उत्साळी शाळेला भेट

उत्साळी येथे मराठी वि .म. ची तपासणी करताना शिक्षण विस्तार अधिकारी सुमित चंद्रमणी, हंबिरराव कदम

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

        आज शुक्रवार दि 16 जुलै रोजी विद्या मंदिर उत्साळी (ता. चंदगड) येथील शाळेला जिल्हास्तरीय शाळा सिद्धी बाहय मूल्यमापन समितीने भेट दिली. यावेळी शालेय कामकाज पाहून समितीने समाधान व्यक्त केले.

       या समितीमधील सुमित चंद्रमणी विस्तार अधिकारी पंचायत समिती आजरा, हंबिराव कदम, शाळा सिद्धी निर्धारक चंदगड यांनी सविस्तर मूल्यांकन करून शाळेला उत्कृष्ट शेरे दिले. यामध्ये आदर्शवत शालेय व अभिलेखे , उत्कृष्ट बाह्यरंग व अंतरंग यासाठी `अ` श्रेणी कायम, पी. पी. टीद्वारे शालेय उपक्रमांचे सादरीकरण, कोरोना काळातील ऑनलाईन व ऑफलाईन पुरावे संग्रही, भरीव लोकसहभाग, ज्ञानरचनावादी शाळा, जे. पी.नाईक पुरस्कार प्राप्त शाळा, तंबाखूमुक्त पुरस्कार प्राप्त, लेझीम पथक कार्यरत, सांस्कृतीक व क्रीडा स्पर्धेत धवल यश, सुसज्ज बाग, मुलांसाठी खेळणी, सुसज्ज ग्रंथालय, प्रत्येक वर्ग डिजिटल क्लासरुम, लोकसहभागातून शालेय विकास, स्वतंत्र शा. पो. आ. कक्ष या सर्व बाबींची तपासणी करून समाधान व्यक्त केले. या यशासाठी पंचायत समिती सर्व अधिकारी व पदाधिकारी, केंद्रप्रमुख श्री. जगताप, मुख्याध्यापक संदीप कदम, विषय शिक्षक संभाजी चिंचणगी, अध्यापक अशोक नाईक, सचिन गवळी, केंद्रातील सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment