दहावी बोर्डाच्या निकालाची बेवसाईट हँग झाल्याने विद्यार्थ्यी नाराज, प्रयत्न मात्र सुरुच, निकालाच्या आणखी लिंक पहा....... - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2021

दहावी बोर्डाच्या निकालाची बेवसाईट हँग झाल्याने विद्यार्थ्यी नाराज, प्रयत्न मात्र सुरुच, निकालाच्या आणखी लिंक पहा.......



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      कोरोणाच्या पार्श्वभूमिवर बोर्ड परिक्षा न झालेल्या  महाराष्ट्र राज्याच्या एस.एस.सी. बोर्डाचा दहावीचा निकाल आज दि. १६ जूलै  रोजी दुपारी  १ वाजता जाहिर करण्यात आला. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्यासह पालक व नातेवाईकांनी निकाल पाहण्यासाठी दिलेल्या बेवसाईटवर एकाचवेळी संकेतस्थळा भेट दिल्याने संकेतस्थळे हँग झाली. त्यामुळे अगदी मोजक्या विद्यार्थ्यांनाच त्याचा निकाल पाहता आला. दुपारी हँग झालेली बेवसाईट  रात्रीपर्यंत तशीच होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यीं नाराज झाले. 

        बेवसाईट हँक झाल्याचे आपल्या व्हॅट्सअपवर स्टेटस ठेवून नाराजी व्यक्त केली. रात्रीपर्यंत विद्यार्थ्यीं व त्यांचे नातेवाईक मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी प्रयत्न करत होते. काही मोजक्या विद्यार्थ्यांना सतत प्रयत्न करत राहिल्याने निकाल पाहता आला. त्यामुळे इतरांनी त्यांच्याकडे फोन करुन निकालाबाबत विचारणा करण्यात येत होती. कोणत्या वेबसाईटवर निकाल पाहिला, मोबाईऊलवर की पीसीवर. अनेकांनी याबाबत नेट कॅफे केंद्रावरही भेट देवून चौकशी केली. मात्र निकाल हाती न आल्याने अनेक विद्यार्थ्यीं मोबाईलवर सर्च करत बसले होते. 

       एकतर कोरोनामुळे परिक्षा झाली नाही. त्यामुळे निकाल कसा लागेल अशी उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्यी व त्यांच्या नातेवाईकांच्यामध्ये होती. मात्र निकाल पाहण्यासाठी एवढी मेहनत घेवूनही निकाल हाती आला नसल्याने विद्यार्थ्यी निराश झाले. तरीही ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी मोबाईल, टॅब, पीसी व लॅपटॉपवर विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरुच होते. विद्यार्थ्यी एकमेकांना फोन करुन निकाल समजला का याची विचारणा रात्रीपर्यंत करताना दिसत होते. 


*निकाल पाहण्यासाठी बेवसाईट* 

http://result.mh-ssc.ac.in

http://mahahsscboard.in

SSC MARCH-2021 RESULT LINKS – 

http://mh-ssc.ac.in 

http://115.124.96.221

 http://115.124.96.23/




No comments:

Post a Comment