कवितेचे नाव - 'जीवन' कालकुंद्री, येथे कविता लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलेली सुंदर कविता - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2021

कवितेचे नाव - 'जीवन' कालकुंद्री, येथे कविता लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलेली सुंदर कविता

खडतर जीवन

कवितेचे नाव - 'जीवन'

       कालकुंद्री येथे कविता लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलेली जीवनाचा सार सांगणारी सुंदर कविता.

       ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर आयोजित कविता लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक विजेती कविता.

      'जीवन' हे सुख दुःख व ऊन सावलीचा खेळ आहे. पतझड, सावन, बसंत, बहार ऋतूंप्रमाणे आपल्याही जीवनात चांगले- वाईट प्रसंग येत असतात. अनुभवांच्या शिदोरीवर संकटांचा सामना करताना आपल्या चेहऱ्यावरील हास्य लोप पावणार नाही याची दक्षता घेत चांगल्याची साठवणूक करा व वाईटाला तिलांजली द्या. असा आठ-दहा ओळीत संपूर्ण जीवनाचा सार सांगणारी ही कविता आहे. नवोदित कवयित्री शिल्पा हिने लिहिलेली ही कविता आपणास नक्कीच अंतर्मुख करेल यात शंका नाही.


                        जीवन 


विसरुनी जावे, जरी असली सुखदुःखांची गाठ

आयुष्याच्या या प्रवासामध्ये, शोधावी पाऊलवाट


ओसरावे ना कधी हे चेहऱ्यावरचे हास्य

असावे उभे उलगडण्यास, भविष्याचे रहस्य


निघूनी जातील एकामागुनी ही अनेक वर्षं

असावा मनात मिळालेल्या अनुभवांचा हर्ष


आसू अन कधी हसू व मित्र आणि शत्रू

सुखदुःख तेच जीवनाचे या बनतात मात्र ऋतू


प्रत्येक गोष्टीचा आहे या जीवनात अंत

स्वप्नांची सुरुवात व्हावी रहावी ना खंत......

                               कवयित्री - कु. शिल्पा कल्लाप्पा पाटील,

                                        कालकुंद्री, ता. चंदगड.


1 comment:

Varun K. Blog said...

Very nice 👌👌👌👌

Post a Comment