जय मल्हार क्रांती संघटनेच्या शनिवारी पदाधिकारी निवडी - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2021

जय मल्हार क्रांती संघटनेच्या शनिवारी पदाधिकारी निवडी



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

              रामोशी, बेरड समाजासाठी कार्य करणाऱ्या जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विभागासाठी नूतन पदाधिकारी निवडी सुरू आहेत. या अंतर्गत चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांसाठी जिल्हा, तालुका, शहरप्रमुख आदी  पदांसाठी संघटनेच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. तुकाराम कोलेकर कॉलेज नेसरी, ता गडहिंग्लज येथे शनिवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित मुलाखतींसाठी कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन संघटनेचे राज्य युवा प्रवक्ता अमोल नाईक यांनी केले आहे. निरीक्षक म्हणून आनंदराव जाधव, प्रवीण नाईक, काकासाहेब चव्हाण, रोहित मलमे, राज मदने, सिताराम नाईक, सुभाष नाईक, परसू नरी, आप्पा चिंचणगी, जयवंत नाईक, संजय नाईक उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment