चंदगड रवळनाथ कॉलेजची धनश्री देसाई १२ वी वाणिज्य शाखेत तालुक्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2021

चंदगड रवळनाथ कॉलेजची धनश्री देसाई १२ वी वाणिज्य शाखेत तालुक्यात प्रथम

धनश्री देसाई हिचा सत्कार करताना प्राध्यापक वर्ग


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             श्री रवळनाथ माध्यमिक विद्यालय व जुनियर कॉलेज चंदगड चा १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कॉलेजची धनश्री रविंद्र देसाई हिने वाणिज्य शाखेत 96.50 % गुण मिळवून तालूक्यात प्रथम क्रमांक मिळवला.

            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षा घेण्यात आल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांना गुण देण्यात आले होते. कॉलेजच्या गुणवत्ता यादीत वाणिज्य शाखेत धनश्री रवींद्र देसाई ही 96.50 % गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर द्वितीय स्थानी पुनम दळवी 87.60 % तर तृतीय स्थानी स्वाती लाड 85.70 % गुण मिळवले आहेत. धनश्री देसाई हिचा प्राचार्य डी .जी. कांबळे व प्राध्यापक वर्गाने अभिनंदन केले. 

1 comment:

Post a Comment