कोवाड व्यापारी मंडळा मार्फत तलाठी दीपक कांबळे यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2021

कोवाड व्यापारी मंडळा मार्फत तलाठी दीपक कांबळे यांचा सत्कार

 कोवाड (ता. चंदगड) येथे बदलीनिमित्त तलाठी दीपक कांबळे यांचा सत्कार करताना दयानंद सलाम, बाजूला नंदकुमार बेळगावकर,आढाव, तलाठी पंचडी,पाटेकर,पाटील आदी.

माणगाव / प्रतिनिधी

             पाच वर्षे कोवाड येथे कार्यरत असलेले तलाठी दीपक कांबळे यांचा बदली निमित्त ग्रामस्थ व गुरूवार पेठ व्यापारी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.        

        कामाच्या माध्यमातून एक सक्षम व मनमिळावू अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केलेले तलाठी श्री. कांबळे यांची कारकीर्द त्यांनी कोवाड येथे २०१९ साली आलेल्या महापुराच्या वेळी तळमळीने केलेले कार्य व कोरोना काळात तेऊरवाडी जंगलात अडकलेल्या ४२ कूंटूबीयाना त्यांच्या मध्यप्रदेशातील मुळगावी सोडवण्या साठी दाखवलेली तत्परता यामुळे लोकांच्या लक्षात राहीली,महापूरात कोवाड गावासाठी व व्यापारी बंधूंच्यासाठी चांगली सेवा बजावली होती तसेच कोरोना काळात सुद्धा गावात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करून रुग्ण संख्या आटोक्यात ठेवली व कोवाड गावासाठी चांगला सेवा बजावली.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.                                     

          यावेळी नुतन तलाठी राजश्री पंचडी, माजी उपसरपंच विष्णू आढाव, व्यापारी सचिन पाटील, नंदकुमार बेळगावकर, विनायक पोटेकर, जोतीबा पाटील, पुंडलिक लाड, प्रवीण गवेकर, सुधीर जाधव, अमित नावलगी, बाळू साळुंके आदीसह व्यापारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment