शिनोळी खुर्द येथे व्यायाम साहित्य उपलब्ध, जि. प. सदस्य अरुण सुतार यांच्या निधीतून मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2021

शिनोळी खुर्द येथे व्यायाम साहित्य उपलब्ध, जि. प. सदस्य अरुण सुतार यांच्या निधीतून मंजूर

 

*शिनोळी खुर्द* : ग्रामपंचायत आवारात साहित्य सुपूर्द प्रसंगी अरुण सुतार, परशराम पाटील, विठ्ठल नाईक व अन्य.

 कागणी : सी. एल. वृत्तसेवा

शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतला जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार यांच्या फंडातून बुधवार दि. १८ रोजी खुल्या जागेतील व्यायाम शाळेसाठी (ओपन जीम साठी) साहित्य उपलब्ध झाले. जिल्हा परिषदेकडून बुधवारी दुपारी सदर साहित्य ग्रामपंचायत कडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी सरपंच परशराम पाटील म्हणाले, आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण सुतार यांनी गावातील तरुण मुलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सदर व्यायाम साहित्य उपलब्ध केले आहे, या साहित्याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. जि. प. सदस्य अरुण सुतार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध तालुक्यात आठ ठिकाणी व्यायाम साहित्य देण्याचे नियोजन सुरू आहे. आगामी टप्प्यात आणखी काही गावांना ओपन जीम साठी साहित्य मिळवून देण्याचा प्रयत्न करू. यासाठी आमदार राजेश पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभले.

यावेळी भरमा पाटील, ग्रामसेवक विठ्ठल नाईक, उमेश पाटील, उमाजी ओऊळकर, बाळू नाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.No comments:

Post a Comment