तेऊरवाडीच्या वैभव पाटीलची जर्मनीपर्यंत झेप - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2021

तेऊरवाडीच्या वैभव पाटीलची जर्मनीपर्यंत झेप


वैभव जनार्दन पाटील


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील येथील वैभव जनार्दन पाटील यांची जर्मनीतील सिमेन्स हैत्थनेस कंपनीमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियर म्हणून निवड झाली. त्यामूळे तेऊरवाडीचे नाव सातासमुद्र पार पोहचले आहे.

     येथील निवृत्त सहाय्यक फौजदार जे. एम. पाटील यांचा वैभव हा मुलगा कॉम्प्यूटर इंजिनियर आहे. गेल्या अनेक वर्षापासून वैभव बंगलोरला कार्यरत होता. तेथील कामाबद्दल त्यांची निवड जर्मनीला झाली. जर्मनीला त्यांच्या सोबत त्यांची पत्नी सौ. संपदा (एम. बी. ए.) व मुलगी  शांभवी रवाना झाले. त्याना तेऊरवाडी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. वैभवच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.



No comments:

Post a Comment