व्हटाचा ओढा नावाच्या शेतात वैद्यकिय कचरा, ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त, कोणत्या ठिकाणचा आहे हा प्रकार.....वाचा..... - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2021

व्हटाचा ओढा नावाच्या शेतात वैद्यकिय कचरा, ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त, कोणत्या ठिकाणचा आहे हा प्रकार.....वाचा.....

मौजे शिरगांव येथे  ओढ्या मध्ये टाकण्यात आलेला वैद्यकिय कचरा

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड जवळ असणाऱ्या मौजे शिरगाव येथील व्हटाच्या ओढ्यामध्ये अज्ञाताकडून वैद्यकिय कचरा टाकण्यात आला आहे. या कचऱ्यामध्ये सलाईन बॉटल, सिरींज, औषधांच्या निकाम्या बॉटल, वापरलेली इंजेक्शन यांचा समावेश आहे. पाण्याच्या प्रवाहाने हा सर्व वैद्यकिय कचरा आजूबाजूच्या शेतामध्ये पसरत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून या प्रकाराने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पाण्यात असलेला वैद्यकीय कचरा.

       वैद्यकिय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. कोणत्याही प्रकारचा असा वैद्यकिय कचरा खुल्या जागेत टाकता येत नाही. पण मौजे शिरगाव येथील  व्हटाची व्हळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा वैद्यकिय कचरा टाकण्यात आला आहे. हा कचरा परिसरातीलच एखाद्या खाजगी डॉक्टरने टाकल्याचा संशय आहे. हा कचरा पाण्याच्या प्रवाहाने आजूबाजूच्या भात शेतामध्ये पसरत आहे. यामध्ये सिरींज असल्याने  याचा प्रचंड धोका या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्माण झाला आहेच पण असा कचरा वैरणीमध्ये मिसळत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाबरोबरच जनावारांच्या जीवासही धोका निर्माण झाला आहे. त्यामूळे असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment