![]() |
शिनोळी (ता. चंदगड) येथे बांधकाम कल्याणकारी असोसिएशन मार्फत कामगारांना स्मार्ट कार्ड व सुरक्षा किटचे वाटप करताना अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे, उपाध्यक्ष चौगुले, सचिव पवार आदी. |
माणगाव / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका बांधकाम कल्याणकारी असोसिएशन मार्फत चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी, बागिलगे, सुंडी, करेकुंडी, सरोळी, शिनोळी खूर्द येथील बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड व सुरक्षा कीट,अत्यावश्यक सेवा संच यांचे वाटप अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे यांचेहस्ते करण्यात आले.
या वेळी अध्यक्ष निवगीरे म्हणाले, ``चंदगड तालुक्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी संघटनेच्या माध्यमातून आपली नोंदणी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई या मंडळाकडे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तालुक्यातील कामगारांनी तडशिनहाळ येथील कार्यालयात आपली नोंदणी करावी. व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष बाबू चौगुले, सचिव मोहन चौगुले, खजिनदार उमाजी पवार, सदस्य सटूप्पा सुतार, शिवाजी पाटील, अवधूत भुजबळ व बांधकाम कामगार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment