उदात्त स्वप्नेच यशाचा मार्ग दाखवितात - प्रा. सुषमा पाटील, सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2021

उदात्त स्वप्नेच यशाचा मार्ग दाखवितात - प्रा. सुषमा पाटील, सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          'आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कधीही छोटी स्वप्ने पाहू नका आणि मोठी स्वप्ने पाहताना कष्ट करायला  लाजू नका. कारण उदात्त स्वप्नेच यशाचा मार्ग दाखवतात. मन खंबीर असले की कुठलेही गंभीर प्रश्न चुटकीसारखे सोडवता येतात. म्हणून आयुष्यात स्वतः बरोबर स्पर्धा करा नक्कीच ध्येयापर्यंत पोचाल.' असे प्रतिपादन प्रा.सुषमा पाटील यांनी केले.

        चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाने आयोजित केलेल्या सामान्य ज्ञान स्पधैच्या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. एन. शिवणगेकर होते. विशेष अतिथी म्हणून बेळगाव येथील रणजित चौगुले  होते.

         प्रास्ताविक बी. एम. पाटील यांनी केले. सिने अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांनी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे जाहिर केली. 

या स्पर्धेत अनुक्रमे 

आयान रियाज शेख - धनंजय विद्यालय नागनवाडी,

स्वाती  पाटील - संजय गांधी विद्यालय, नागनवाडी

श्रेया पाटील - विद्यामंदिर गवसे,

शैलेश  धुडूम _ धनंजय विद्यालय नागनवाडी

सायली  नेवगे- विद्यामंदिर गवसे,

श्रेया पाटील - धनंजय विद्यालय नागनवाडी,

दिपक  पाटील -संत तुकाराम हायस्कूल सुंडी,

दिक्षांत  कांबळे -धनंजय विद्यालय नागनवाडी

तर उत्तेजनार्थ म्हणून

मंदार  गायकवाड- दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड,

मधुरा  चांदेकर - संजय गांधी विद्यालय, नागनवाडी

अथर्व  बेळगावकर - सरस्वती विद्यालय कालकुंद्री,

अथर्व  नाईक - बी.एस. पाटील हायस्कूल, होसूर

पियुष फडके - छत्रपती शिवाजी हायस्कूल माणगाव,

सुनैन  फडके - भाईदाजिबा देसाई विद्यालय,पार्ले

मयुरेश  चांदेकर - मराठी विद्यामंदिर, नागनवाडी  

         यांनी क्रमांक पटकावले. यावेळी अनुराधा शिरगावकर, मंदार गायकवाड, सानिका पाटील स्वरांजली पाटील या विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले.रणजित चौगुले, संजय साबळे यांची मनोगते झाली. संयोजक संजय साबळे व तंत्रस्नेही शिक्षक, संकल्पना रवींद्र पाटील यांनी यशस्वीपणे हातळले .कार्यक्रमाचे आभार बी. एन. पाटील यांनी तर सुत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले.No comments:

Post a Comment