चंदगड नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत विविध समस्यांवर चर्चा, वाचा विषयावर झाली चर्चा........ - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2021

चंदगड नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत विविध समस्यांवर चर्चा, वाचा विषयावर झाली चर्चा........

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष सौ. प्राची दयानंद काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण -२०२० / प्र क्र. ३३ / अजाकमंत्रालय मुंबई दिनांक ११/१२/२०२० प्रमाणे चंदगड शहरातील जातींचा उल्लेख असलेल्या रस्त्यांची / वस्त्यांची नावे बदलने बाबत विचार विनिमय झाला असून ब्राम्हण गल्ली साठी हनुमान गल्ली, कुंभार गल्ली साठी गणेश गल्ली आणि कुंभार वसाहत साठी मिल्लतनगर याप्रमाणे चंदगड शहरातील जातीवाचक ठिकाणांची नावे बदलण्यावर तसेच चंदगड शहरातील लिंगायत समाजाची पूर्वापार पासून प्रेते दफन करत असलेल्या गट नंबर ६१६ मधिल मठाच्या जागेस रुद्र भूमी म्हणून नाव देणेबाबत सर्वानुमते निर्णय होऊन ठराव समंत झाला.

         याव्यतिरिक्त अन्य १९ विषय व आयत्यावेळचे ४ विषयावर चर्चा होऊन सर्वानुमते ठराव समंत झाले मुख्याधिकारी अभिजित जगताप यांनी कायदेविषयक बाबींची सविस्तर माहिती सांगितली यावेळी उप नगराध्यक्ष  फिरोज मुल्ला, विरोधीपक्षनेते दिलीप चंदगडकर नगरसेवक अभिजित गुरबे, श्रीमती मुमताजबी सुलेमान मदार, सौ. नुरजहान  नाईकवाडी, झाकीर नाईक, आनंदा हळदणकर, सौ. अनुसया  दाणी, सौ. अनिता परिट, सचिन नेसरीकर, सौ. माधुरी कुंभार, सौ संजिवन चंदगडकर, सौ. प्रमिला गावडे, सौ. संजना कोकरेकर, शिवानंद हुंबरवाडी, ड. विजय कडूकर यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. सभा अधीक्षक संतोष कडूकर यांनी सभेचे वाचन केले. यावेळी खाते प्रमुख ऋषिकेश साबळे, प्रवीण पाटील, विजय पाटील, विजयकुमार मुळीक, दत्तात्रय टोपे, राजू शिंदे यांनी उपस्थित राहून आपल्या विभागाची माहिती दिली. सभा अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सौ. प्राची दयानंद काणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.




No comments:

Post a Comment