चंदगड येथे १८ ते ४४ वयोगटाकरिता कोविड लसीकरणाचा शुभारंभ, मात्र नोंदणी आवश्यक........वाचा सविस्तर..... - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2021

चंदगड येथे १८ ते ४४ वयोगटाकरिता कोविड लसीकरणाचा शुभारंभ, मात्र नोंदणी आवश्यक........वाचा सविस्तर.....

 

चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटाकरिता कोविड लसीकरणाचा शुभारंभ प्रसंगी आम राजेश पाटील,जि.प.सदस्य बल्लाळ, रणवरे,डाॅ. खोत, सभापती ॲड.काबळे, बीडीओ बोडरे,काणेकर आदी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात  १८ ते ४४ वयोगटाकरिताच्या लसीकरणाचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांचे शुभ हस्ते करणेत आला. यावेळी सभापती ॲड. अनंत कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, चंदगडच्या नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर, तहसिलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. आर. के. खोत, वैद्यकिय अधिक्षक डॉ. एस. एस. साने व डॉ. सचिन गायकवाड उपस्थित होते. 

         या लसीकरणासाठी COWIN APP वर Online ( Registration ) नोंदणी करुन व Appointment (Slot) घेऊनच येणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी फक्त २०० डोस देण्यात येणार असलेने Appointment असल्याशिवाय डोस देता येणार नाही. त्यामुळे नागरिकानी Appointment घेऊनच यावे असे आवाहन डॉ. खोत यांनी केले आहे. तसेच प्रत्येक सोमवारी दिव्यांग, नोकरीसाठी, शिक्षणासाठी, परदेशी जाणारे व्यक्ती व गरोदर माता यांना सकाळी ९ ते २ या वेळेत कोविड लसीकरण ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे देणेत येणार आहे.

No comments:

Post a Comment