दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्तांना पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत मदत - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2021

दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्तांना पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत मदत

 

दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्तांना पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत मदत देताना जिल्हाध्यक्षा संजना गवस, उपाध्यक्षा पूजा गावडे तुषार देसाई, राजाराम फर्जद, संजय सावंत,संजय नाटेकर, गौरेश राणे, अनुराग सिनारी आदी

दोडामार्ग /प्रतिनिधी 
    आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने दोडामार्ग परिसरातील कुडासे भरपाल येथील गावांना पूराचा मोठा फटका बसला . यामध्ये अनेक घरांमध्ये पूराचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक  कुटुंबातील जीवनावश्यक वस्तूंचे व इतर साहित्यांचे या पत्राच्या पाण्याने नुकसान झाले. 
        सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात देण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली.
तांदुळ, कांदे, बटाटे, तेल, डाळी, साखर, पावडर आदी वस्तूंचा या मदतीमध्ये समावेश होता.
           यावेळी संस्थेच्या जिल्हाध्यक्षा संजना गवस,उपाध्यक्षा पूजा गावडे दोडामार्ग तालुकाध्यक्ष तुषार देसाई, उपाध्यक्ष राजाराम फर्जद, संजय सावंत,संजय नाटेकर, गौरेश राणे, अनुराग सिनारी उपस्थित होते.
    या मदत कार्यासाठी प्रकाश कदम व संस्था कार्यकारणी सदस्य यांनी विशेष मार्गदर्शन केले.




No comments:

Post a Comment