कालकुंद्री येथील वीर देव यात्रा रद्द, कोरोनामुळे निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2021

कालकुंद्री येथील वीर देव यात्रा रद्द, कोरोनामुळे निर्णय

वीरदेव
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

          कालकुंद्री (ता. चंदगड) येथील वीरदेव यात्रा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. कालकुंद्री व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेली वीरदेवाची (वड्डाचा ईर) यात्रा आषाढ महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दरवर्षी उत्साहात साजरी होते. यावर्षी ही यात्रा शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी नियोजित होती. तथापि मागील वर्षीपासून सुरु असलेल्या कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, कोरोना दक्षता कमिटी व यात्रा कमिटी यांच्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यात्रेच्या दिवशी भाविक तसेच पाहुणे मंडळींनी कालकुंद्री येथे येऊ नये. असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment