प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना चंदगड भूषण पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2021

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना चंदगड भूषण पुरस्कार प्रदान

चंदगड भूषण पुरस्कार प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना देताना मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट समजला जाणारा चंदगड भूषण पुरस्कार २०२०- २१ सालाकरिता गडहिंग्लज येथील उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी रोजगार हमी मंत्री भरमू  अण्णा पाटील होते. रोखठोक आवाजाचे संपादक व निवड कमिटीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळवीकर सह कमिटीने नियोजन केले होते. 

        यावेळी प्राध्यापक सुनील शिंत्रे आजरा साखर कारखाना चेअरमन), संभाजीराव देसाई शिरोलीकर (तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस), तानाजी गडकरी (संचालक तालुका संघ,) विलास पाटील (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर), नागेश चौगुले (जिल्हाध्यक्ष मनसे, कोल्हापुर), प्रताप पाटील (जिल्हा उपाध्यक्ष मनसे), रामू पारसे (सरपंच संघटना तालुकाध्यक्ष), बापू शिरगांवकर (अध्यक्ष इंटरनॅशन मानवाधिकार), विष्णू गावडे ( सरपंच), पांडू बेनके, राहुल शिर्कुळे, संज्योती मळवीकर (शिवसेना जिल्हा महिला संघटक), शांता जाधव जिल्हा उपसंघटक बसवंत आडकर यांच्यासह  बळवंत तळेकर  (पोलीस निरीक्षक चंदगड) विनोद रणवरे (तहसीलदार चंदगड)  चंद्रकांत बोंडरे(बी डी ओ पंचायत समिती चंदगड), जगदीश जगताप (नगरपंचायत मुख्य अधिकारी ) सासणे (सार्वजनिक बांधकाम उप अभियंता चंदगड), घोरपडे, वर्षा केसरकर, अशोक कोळी (मंडळ अधिकारी), प्रवीण खरात (मंडळ अधिकारी), बी आय देसाई ,(मंडळ अधिकारी )अमर पाटील, राजश्री पचांडी (तलाठी), स्वाती सुतार (तलाठी), सपना ठकरोड (तलाठी), तेजस्विनी पाटील (तलाठी) ,रूपाली कांबळे (तलाठी) , माया करवळ (वरिष्ठ लिपिक ) विलास पाटील (महसूल अ .का) संजय राजगोळे (महसूल अ. का )सचिन गाडीवर्डर( महसूल अ .का) फारुख नाईक सेतु विभाग, भगवंत पाटील  उपस्थित होते.

   सदानंद पाटील यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी आर. एन. पाटील, सुभाष जाधव, अनिल गावडे, परशराम मळवीकर, रमेश पाटील यांच्यासह तहसील कार्यालय कर्मचारी उपस्थित होते.






No comments:

Post a Comment