चंदगडकरांच्या ॠणात राहीन - प्रांताधिकारी पांगारकर, चंदगड येथे चंदगड भुषण पुरस्काराचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2021

चंदगडकरांच्या ॠणात राहीन - प्रांताधिकारी पांगारकर, चंदगड येथे चंदगड भुषण पुरस्काराचे वितरण

चंदगड येथे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना चंदगड भुषण पुरस्कार प्रदान करताना भरमुआण्णा पाटील, संतोष मळविकर,प्रा.सुनील शिंत्रे, संभाजीराव देसाई आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        महाबळेश्वर सारखे निसर्गसौंदर्य लाभलेल्या चंदगड तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून अर्थक्रांती निर्माण करण्यास वाव आहे. शासन व लोकप्रतिनिधी यांचे प्रयत्न महत्वाचे आहे. येथील लोकं जरी रागिष्ट वाटत असली तरी ती फणसासारखी गोड आहेत. त्यामुळे चंदगडचे निसर्ग सौंदर्य आणि जनतेचं प्रेम आयुष्यभर स्मरणात राहील असे प्रतिपादन गडहिंग्लज विभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केले. त्या चंदगड येथे आयोजित "चंदगड भुषण" पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यावेळी तहसीलदार विनोद रणावरे, पो. नि. बी. ए. तळेकर गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे,मुख्याधिकारी अभिजित सुर्यवंशी उपस्थित होते.

नंदकुमार ढेरे याना जि.प.चा प्र के अत्रे पुरस्कार मिळाल्याबदल सत्कार करताना प्रांताधिकारी पांगारकर बाजूला माजीमंत्री भरमूआण्णा पाटील

     प्रारंभी ॲड. संतोष मळविकर यांनी प्रास्ताविकात प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी कामाच्या माध्यमातून चंदगडच्या जनतेमध्ये वेगळे स्थान निर्माण केल्यानेच त्यांना चंदगड भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे सांगितले.

       पांगारकर पुढे म्हणाल्या गेल्या दोन -तीन वर्षात कोरोना, महापूर यामुळे चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावाला भेटी दिल्या. कोरोनि महामारी, पूरपरिस्थिती असतानाही येथील जनतेकडून प्रशासनास लाभलेले सहकार्य हे न विसारण्यासारखं आहे.हेरे सरंजाम ,जातवैधात दाखले यासारखे विविध प्रश्न सोडवताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. पण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून शक्य तितके सहकार्य केले असल्याचे सांगितले.

       प्रारंभी ॲड. संतोष मळविकर यानी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी कामाच्या माध्यमातून चंदगडच्या जनतेमध्ये वेगळे स्थान निर्माण केल्यानेच त्यांना चंदगड भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे स्पष्ट केला.

        यावेळी भरमुआण्णा पाटील म्हणाले, ``चंदगड तालुका हा जिल्हयाच्या राजकीय दृष्टिकोनातून मागास आहे .पण इथले लोक, येथील भौगोलिक परिस्थिती मागास नाही . प्रांताधिकारी यासारखे शासकीय अधिकारी यांनी यापुढे आपल्यासारखे सहकार्य दाखवले तर तालुका प्रति महाबळेश्वर म्हणून विकसित होईल.तर शासकीय अधिकाऱ्याचा सन्मान हा त्याच्या केलेल्या सेवेवर अवलंबून असतो गडहिंग्लज उपविभागात पांगारकर मॅडम यांचे काम हे आदर्शवत आहे. त्यांचे योगदान जनता कायम लक्षात ठेवली असे मत प्रा. सुनील शिंत्रे यांनी व्यक्त केले. जनतेसाठी अहोरात्र काम करून  या उपविभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगले यांनी सांगितले.``

        यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांना जि.प.चा प्र के अत्रे पुरस्कार मिळाल्याबदल प्रांताधिकारी पांगारकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पो. नि. बी. ए. तळेकर, संभाजीराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केली. 

       कार्यक्रमाला संजय साबळे, नायब तहसीलदार संजय राजगोळे,अशोक कोळी, तानाजी गडकरी, संज्योती मळवीकर, शांता जाधव, संज्योति मळविकर, शारदा घोरपडे, पांडुरंग बेनके, विष्णु गावडे ,विलास पाटील बसवंत अडकुरकर, रामभाऊ पारसे, राजू पाटील, बापू शिरगावकर, अनिल गावडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केले. आभार प्रताप पाटील यांनी मानले.No comments:

Post a Comment