सभापती ॲड. कांबळे यांची पिळणी नुकसानग्रस्त भागाला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2021

सभापती ॲड. कांबळे यांची पिळणी नुकसानग्रस्त भागाला भेट

 

पिळणी (ता. चंदगड) येथील घटप्रभा नदीकाठी नुकसानग्रस्त भागाची पहाणी करताना सभापती ॲड अनंत काबळे,बाजूला शेतकरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         पंचायत समिती चंदगडचे सभापती ॲड. अनंत कांबळे यांनी पुरबाधित पिळणी व कानडी गावाना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

        यावेळी पिळणी गावातील घरात पाणी शिरलेल्या २६ घरांचे व पिकांचे  पंचनामे झाले नसल्याचे नागरिकानी राच्या पाण्यात बुडलेल्या घरांचे व पिकांचे निटपणे पंचनामे झाले की नाही याची पिडीत नागरिकांकडून माहीती घेतली..या वस्तुस्थीतीचे पंचनामे करणे बाबत संबधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या जातील असे सभापतींनी सांगितल.पिळणी, कानूर व इब्राहिमपूर लसीकरण केंद्रला भेट देवून आढावा घेतला. कानडी येथे नुकसानग्रस्त नागरिकांच्या भेटी घेतल्या व रमाई आवास घरकुल योजना व घरकुल योजना या योजनेसाठी योग्य ती कागदपत्रे जमा करून ग्रामपंचायतीव्दारे पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करणेच्या सुचना दिल्या. यावेळी प्रा. दिपक कांबळे, कानूरचे सरपंच व ग्रामसेवक, नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment