हलकर्णी औद्योगिक वसाहतीत असलेल्या तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चालु शैक्षणिक वर्षांसाठी (ऑगस्ट 2021) इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, ड्रेस मेकिंग (मुलींसाठी) या व्यवसायामध्ये इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध झाल्या आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून प्रवेश अर्ज admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तरी इच्छुकांनी या प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन प्राचार्य तुर्केवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यांनी केले आहे.
13 August 2021
Home
chandgad
तुर्केवाडी आय. टी. आय. प्रवेशासाठी आवाहन
No comments:
Post a Comment