![]() |
सांबर : संग्रहित छायाचित्र |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात किल्ले पारगडच्या पायथ्याशी असलेल्या मिरवेल गावाच्या हद्दीत मृतावस्थेतील सांबर (स्थानिक भाषेत- शिंगाडी) आढळून आले. पारगड, नामखोल व मिरवेल ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष पवार व त्यांचे सहकारी सुर्यकांत पवार मिरवेल ते मोर्ले मार्गावरुन दुचाकीने जात असताना हे सांबर दिसले. जंगली कुत्र्यांनी हल्ला करून या सांबर आला. ठार केल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. याबाबत सरपंच पवार यांनी वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली.
चंदगड तालुक्याच्या पश्चिमेकडील हेरे ते पारगड या पंचवीस किलोमीटरच्या पट्ट्यात व त्यापुढील मोरले घोटगेवाडी या दोडामार्ग तालुक्यातील परिसरात असलेल्या जंगल व राखीव जंगलात बिबट्या, काळे पट्टेरी वाघ, अस्वल, सांबर, भेकर, डुक्कर, साळींदर, लांडगे, जंगली कुत्रे, अजगर असे अनेक जंगली प्राणी पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यात आता गव्यांच्या कळपांचीही भर पडली आहे. अन्नसाखळीत हे घटक परस्परांवर अवलंबून असल्यामुळे अशा घटना परिसरातील जंगलात सर्रास घडत असतात.
No comments:
Post a Comment